प्रस्तावना

संकेतस्थळाविषयी थोडेसे...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१८८३-१९६६) हे वीर देशभक्त, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी, महाकवी, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार, नेते व तत्वज्ञ होते. सावरकर हे खर्‍या अर्थाने सर्वस्पर्शी विचार करणारे राष्ट्रशिल्पकार होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक आहेत. दुर्दैवाने, सावरकरांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर विपर्यास करण्यात आला आहे. त्यांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू महाराष्ट्राबाहेर अज्ञात आहेत.

इंटरनेट हे आजच्या माहितीयुगातील महत्त्वाचे साधन आहे. परंतु यावरदेखील सावरकरांविषयी फ़ारच थोडी माहिती आहे. सावरकरांचे जीवन, विचार व कार्य यांना जगभर पोहोचविण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. योगायोगाने हे संकेतस्थळ २००८ साली म्हणजेच सावरकरांच्या १२५व्या जयंती वर्षी प्रसिद्ध झाले. सावरकरांविषयी संदर्भासहित अचूक माहिती देणे हे या संकेतस्थळाचे उद्दिष्ट आहे.

संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्याचे विमोचन दि. २६ फ़ेब्रुवारी २००८ या सावरकरांच्या आत्मार्पण-दिवशी झाले. सशस्त्र क्रांती, समाजसुधारणा, बुद्धिवाद व हिन्दुत्व हे सावरकरांच्या जीवनाचे महत्वाचे बिंदू होते. संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्यात या चार विषयांना प्राधान्य दिलेले असून या विषयांवरील सावरकरांचे मूळ साहित्य देण्यात आले आहे. शिवाय सावरकरांचा संक्षिप्त जीवनपटही देण्यात आला आहे. सावरकरांची शेकडो दुर्मिळ छायाचित्रे, त्यांच्या आवाजातील भाषणे, चलचित्रफ़िती या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये आहेत. सन १९२४ मध्ये लिहिलेले सावरकरांचे पहिले मराठी चरित्र या संकेतस्थळात दिले आहे. हे संकेतस्थळ सावरकरांचे थोरले बंधू कै. बाबाराव व वहिनी कै. सौ. येसूवहिनी यांना समर्पित आहे.

हे संकेतस्थळ हौशी तत्त्वावर सिद्ध करण्यात आले आहे. सावरकरप्रेमाचा समान धागा असलेल्या अनेक व्यक्ती व संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संकेतस्थळ साकार झाले आहे.

हे संकेतस्थळ वेळोवेळी सम्रृद्ध करण्याचा प्रयत्न चालू राहील. या संकेतस्थळाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहन आम्ही यानिमित्त करत आहोत.

 

आभार:

 • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.
 • अभिनव भारत मंदिर न्यास, नाशिक
 • डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे
 • हिंदु महासभा भवन, नवी दिल्ली
 • आदित्य प्रतिष्ठान, पुणे
 • मुंबई हिंदुसभा
 • विश्वास विनायक सावरकर
 • हिमानी आशोक सावरकर
 • वासुदेव शंकर गोडबोले, लंडन
 • अरविंद सदाशिव गोडबोले, मुंबई
 • प्रेम वैद्य, पुणे
 • सुहास बहुलकर, मुंबई
 • प्रभाकर गंगाधर ओक, मुंबई
 • श्रीधर दामले, शिकागो
 • अनुरूपा सिनार, अमेरिका
 • चंद्रशेखर साने, पुणे
 • अक्षय मुकूंद जोग, पुणे
 • डॉ. हरिंद्र श्रीवास्तव

आणि अज्ञात राहू इच्छिणार्‍या अनेक व्यक्ती..