दृक्

सावरकरांचे चलचित्रण

सावरकरांचे दुर्मिळ चलचित्रण येथे उपलब्ध. [1M]

 

चित्रपट विभागाचा माहितीपट

प्रेम वैद्य यांनी भारत सरकारच्या चित्रपट विभागासाठी सावरकरांवर बनविलेल्या या माहितीपटाला ‘फिल्म फेअर’ पुरस्कार मिळाला आहे. हा माहितीपट १९८३ या सावरकर जन्मशताब्दी वर्षात प्रदर्शित झाला होता.

हिंदी [440M] /ईंग्रजी [440M]

 

सेल्युलर कारागृहाचा इतिहास

Flash[13M] / MPEG4[39M]

  

क्रिप्स शिष्टमंडळ

ब्रिटिश संसदेने १९४२ मध्ये भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी क्रिप्स शिष्टमंडळाची नेमणूक केली होती. मजूर पक्षातील जहाल सदस्य व चर्चिलच्या युध्दमंत्रीमंडळातील मंत्री सर स्टॅफोर्ड क्रिप्स त्याचे अध्यक्ष होते. जपानने सिंगापूर (१५ फेब्रुवारी १९४२), रंगून (८ मार्च), अंदमान (२३ मार्च) मध्ये केलेल्या पराभवामुळे ब्रिटीश साम्राज्याला तडे जाण्याची भिती होती. ह्या पार्श्वभूमीवर, ब्रिटिशांना भारतीय जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी काही सवलती देण्याची आवश्यकता वाटू लागली.

क्रिप्सने युद्धसमाप्तीनंतर शक्य तितक्या लवकर ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत भारतीय संघराज्य निर्माण करण्याची ब्रिटिश शासनाची सिध्दता असल्याचे जुनेच उद्देश पुन्हा घोषित केले व त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची तत्परता दाखविली. प्रादेशिक विधीमंडळे संविधान समितीची नेमणूक करेल की जी निर्वाचन मंडळाची भूमिका पार पाडेल. ही समिती नंतर ब्रिटिश शासनासोबत करारासंबंधीच्या वाटाघाटी करेल. भविष्यात संघराज्यातून फुटून निघण्याचे अधिकार स्पष्टपणे निर्देशित केले होते. भारतीय राज्यांना सहभागी होण्याची मुभा दिली होती व नवीन परिस्थितीनुरूप करारात सुधारणा करण्याचीही योजना उद्ध्रुत केली होती.

२६ मार्च १९४२ ला सावरकर दिल्लीला क्रिप्स भेटीसाठी निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी बॅरिस्टर जमनादास मेहता, डॉ. मुंजे, कन्हैयालाल मुन्शी, ल. ब. भोपटकर, रामभाऊ राजवाडे ह्यांच्याशी चर्चा केली होती व त्यावेळी कोलकतामध्ये असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींशीही दूरध्वनीवर चर्चा झाली होती तसेच विविध व्यक्तींशी पत्रव्यवहारही केला होता. काँग्रेस व  मुस्लिम लीगला प्रत्येकी ६ व हिंदूमहासभेला ३ प्रतिनिधी पाठविण्यास सांगितले होते. त्याव्यतिरिक्त काही इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व स्वतंत्र नेत्यांनाही क्रिप्स-भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यापैकीच मु. रा. जयकर हे एक निमंत्रित नेते होते. सावरकर व जयकर एकाच आगगाडीने दिल्लीला गेले होते. २८ मार्च १९४२ ला दुपारी सावरकरांसोबत डॉ. मुखर्जीं, डॉ. मुंजे, सर ज्वालाप्रसाद श्रीवास्तव व विधिज्ञ गणपत राय ह्यांनी क्रिप्सची एक तास चर्चा केली.

खालील चलतचित्रात सर स्टॅफोर्ड क्रिप्स भेटीसाठी सावरकरांसोबत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं, डॉ. मुंजे ह्यांचे आगमन होताना दिसेल.

सौजन्यः गांधी चित्रपट प्रतिष्ठान

WMV[2M]    YouTube link

 

अखिल भारत हिंदू विद्यार्थी परिषद

अखिल भारत हिंदू विद्यार्थी सभेचे वार्षिक अधिवेशन डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजेंच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारत हिंदू महासभेचे वार्षिक अधिवेशन (दिनांक २९ ते ३१ डिसेंबर १९४२, वि दा सावरकरांच्या अध्यक्षतेखाली) कानपूरला एकत्र भरले होते. हिंदूंच्या सैनिकीकरणाला चर्चेत प्राधान्य देण्यात आले होते. सावरकरांनीही हिंदूंच्या सैनिकीकरण चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद देण्याचे दमदार आवाहन केले होते. डॉ. मुंजेंनीही हिंदू विद्यार्थ्यांना कणखर होऊन भारतीय एकतेला आव्हान देणार्या प्रयत्नांचा प्रतिशोध घेण्याची व त्यासाठी सैनिकी प्रशिक्षण घेण्याची कळकळीची विनंती केली होती.

अखिल भारतीय हिंदू विद्यार्थी परिषद चलतचित्रासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.

सौजन्यः साम्राज्य युध्द संग्रहालय (Courtesy: Imperial War Museum, London)

MPEG4 [1.4M] AVI [4.2M] FLV [3M]  YouTube link

 

सावरकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त प्रकट सत्कार, मुंबई

सावरकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त रविवार ६ जून १९४३ ला गोवालिया टँक मैदानावर (आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई) सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला होता. हा सोहळा रँग्लर रघुनाथराव परांजपेंच्या अध्यक्षतेखाली झाला होता. सावरकर पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात व पुत्र विश्वाससह समारंभस्थळी पोहोचल्यावर त्यांचे ६१ सुवासिनींनी पारंपारिकपध्दतीने स्वागत केले. सुशोभित गजाने सावरकरांना हार घातला. प्रसिध्द गायक-नट भालचंद्र पेंढारकरांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. हिंदू राष्ट्र दलाच्या स्वयंसेवकांनी सावरकररचित अखिल हिंदू ध्वज गीत गायन केले. ह्यानंतर पेंढारकरांनी सावरकरांच्या आदराप्रीत्यर्थ रचलेले विशेष गीत सादर केले. वीर सावरकर अभिनंदन समितीचे अध्यक्ष राव बहाद्दुर उमाकांत देसाई म्हणाले की, सावरकरांची राजकीय परंपरा प्राचीन आहे व हिंदू समाज सावरकरांच्या नेतृत्वखाली बलशाली होईल. त्यांनी अशीही माहिती दिली की सावरकर थैलीसाठी ५५००० रूपये गोळा करण्यात आले आहेत व असा विश्वास आहे की २५ जूनपर्यंत एकूण रक्कम ६१००० रूपयांपर्यंत पोहोचेल. अध्यक्ष परांजपे म्हणाले की सावरकरांची उपजत बुध्दीमत्ता, प्रखर वक्तृत्व व आकर्षक व्यक्तिमत्व विपुल अनुभवाने व क्रुतीने समृद्ध झाले आहे; परिणामतः ह्यांचे राजकारण अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांनी सावरकरांच्या हिंदूंच्या सैनिकीकरणाच्या प्रयत्नांचे व धर्माचे राजकारणासोबत मिश्रण करणार्या नेत्यांविरोधात उभे राहणार्या त्यांच्या निर्भयतेचे कौतुक केले. ह्यानंतर सरस्वतीबाई कवनीकर, नरीमन, बॅरिस्टर जमनादास मेहता, पंडित चंद्रगुप्त वेदालंकार ह्यांची सावरकरांच्या स्तुती-पर भाषणे झाली. राव बहाद्दुर देसाईंनी मानपत्राचे वाचन केले व अध्यक्ष परांजपेंनी चांदीच्या पेटीत मानपत्र सावरकरांना अर्पण केले. चांदीच्या पेटीत सावरकरांनी मार्सेलिसला १९१० ला पराक्रमी पलायन केलेल्या एस्.एस्. मोरिया आगनावेची प्रतिक्रुती होती व त्यावर 'वक्ता, विद्वान, लेखक, कविवर, थोर हुतात्मा तू |    अभिनव भारत मनोरथांचा मूर्त दिव्य केतू' हे शब्द कोरले होते. माई सावरकरांना साडी व शूभसूचक भेटवस्तू प्रदान केल्या. विविध संस्थांनी सावरकरांना भरपूर हार घातले होते. त्यानंतर सावरकरांनी उस्फूर्तपणे तासभर भाषण केले. त्यांनी ह्या समारंभाचे ‘आयुष्यातील संस्मरणीय प्रसंग’ असे वर्णन केले. ह्याव्यतिरिक्त, जीनांचा सर्व अल्पसंख्यांकांच्या वतीने बोलत असल्याचा दावा भंपक आहे असेही सांगितले. पारशी, ज्यू, आंग्ल-भारतीय, ख्रिश्चनांनी देशाच्या फाळणीची मागणी कधीही केली नसल्याचे ठामपणे सांगितले. काही पूर्वास्प्रुश्यांच्या वेगळ्या भूमीची मागणीने भयभीत होण्याचे कारण नसल्याचेही सांगितले. ते म्हणाले की त्यांनी ह्याविषयी डॉ. आंबेडकरांशी ह्याच मूलाधारावर चर्चा केली आहे. ते असे सांगू इच्छित होते की त्या चतुर्थांशाकडून भयभीत होण्याचे कारण नाही. मुसलमानांव्यतिरिक्त कोणीही जीनांच्या बाजूला नाही व तसेच मुसलमानातील काही समुदायाचाही जीनांना पाठींबा नाही. सावरकरांनी हिंदू व इतर मुसलनानेतर अल्पसंख्यांकाच्यावतीने निपक्षपाती नागरिकत्वाची मागणी केली. पाकिस्तानचे संकट टाळावयाचे असेल तर सर्वांनी स्वातंत्र्य व हिंदुस्थानचे अखंडत्व ह्यावर विश्वास ठेवणार्या हिंदू समर्थकालाच पुढील निवडणूकांमध्ये पाठींबा देण्याची शपथ घ्यावयास हवी असे सांगितले.

षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार समारंभाचे चलतचित्र पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा. ह्यात तुम्हाला सावरकरांसोबत त्यांच्या पत्नी माई सावरकर, कन्या प्रभात, पुत्र विश्वास, रँग्लर परांजपे (मिशीमध्ये; सावरकर स्वतःचा हार त्यांच्या गळ्यात घालत आहेत) व राव बहाद्दुर देसाई दिसतील.

सौजन्यः साम्राज्य युध्द संग्रहालय (Courtesy: Imperial War Museum, London)

MPEG4 [1.9M] AVI [7M] FLV [4.9M]  YouTube link

 

पंजाब प्रातीय हिंदू परिषद, वार्षिक अधिवेशन, ल्यालपूर, ३० एप्रिल १९४३

पंजाब प्रातीय हिंदू परिषदेचे ३० एप्रिल १९४३ ला ल्यालपूरला सुशोभित मंडपात थाटात उद्घाटन झाले. ल्यालपूर स्थानकात आगगाडी पोहोचल्यापासून सुरू झालेली मिरवणूक निर्वाचित अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जयजयकारात परिषद स्थळी पोहोचली.  १२ बैलांद्वारे मार्गक्रमण करणारा, भव्य सुसज्जित, प्राचीन हिंदू परंपरेनुरूप निर्मित रथात विराजमान श्यामाप्रसाद मुखर्जींना घेऊन जाणारी मिरवणूक जवळजवळ मैलभर लांब पसरली होती. किमान ३०००० जनता मिरवणूकीत सहभागी होती. राजा नरेंद्रनाथांनी परिषदेचे उद्घाटन केले. डॉ. मुंजेंनी हर्षभरित सभेत चितोर गडावर मध्यभागी हिंदूसभेचा ध्वज फडकावला. डॉ. मुखर्जींनी अध्यक्षीय भाषणात भारताच्या फाळणीला कडाकडून विरोध केला व ह्या संघर्षमय व युध्दमान स्थितीतून स्वातंत्र्य, न्याय व समेतेवर आधारित नवविश्वाची निर्मिती होईल अशी आशा व्यक्त केली. डॉ. बा. शि. मुंजे, राय बहाद्दुर मेहरचंद, सर गोकुलचंद नारंग, राजा नरेंद्रनाथ व श्री गोस्वामी गणेश दत्त हे इतर प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मंडपाबाहेर 'अखंड हिंदुस्थान'चे भव्य मानचित्र लावलेले होते. ३ मे १९४३ ला परिषदेचा समारोप झाला.

डॉ. बा. शि. मुंजे व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, प्रभावी अध्यक्षीय मिरवणूक, ध्वजारोहण व ल्यालपूर हिंदूसभा परिषदेची कार्यव्रुत्ताची दुर्मिळ चलतचित्रे पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.

सौजन्यः साम्राज्य युध्द संग्रहालय (Courtesy: Imperial War Museum, London)

WMV[20.42M]

 

अंतिम संस्कार

FLV[81M]

दुर्लभ भाषण

WMV[11M]

सावरकर निळा फलक, लंडन

यूट्यूब लिंक

 

www.savarkar.org संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे सावरकरांवरील भाषण, दिनांक २८ मे २००८ 

https://www.youtube.com/watch?v=f4RdKk4qtLc

 

पु.ल. देशपांडे यांचे स्वांतत्र्यवीर सावरकरांबद्दलचे दुर्मिळ भाषण (भाग १ व २)

https://www.facebook.com/video.php?v=10151847926367813

https://www.facebook.com/video.php?v=10151848261347813