समाजहितकारक कोणताही धंदा हीन नाही

    पण तो सोडलात तरी राग नाही,

    अस्पृश्यता निवारण्याच्या ह्या कार्यी संघर्ष घडण्याची जी कारणे आहेत त्यात अस्पृश्य जाति आपला धंदा "हीन' म्हणून कधी कधी तो अकस्मात सोडू पाहतात हे एक कारण असते. कुठे कुठे महार ढोरे न ओढण्याचा संप करतात. गावकरी चिडतात आणि महारांची बलुते बंद करतात. गावकरी चिडतात आणि महारांची बलुते बंद करतात, की उलट महार चिडतात! अशा ठिकाणी नवीन निर्बंधाप्रमाणे असे समजावून द्यावे की, समाजहितकारक असणारे धंदे कोणीही "हीन' मानू नयेत. ते धंदे न सोडताही आता कोणाला अस्पृश्य समजले जाण्याची भीति उरलेली नाही. पण जर कोणाला आपला धंदा सोडायचा असलाच, तर ते व्यवसाय स्वातंत्र्य त्याला मिळालेले आहे. जर महाराला ढोरे ओढायची नसलली, तर त्याने तो धंदा सोडावा, पण मग जर त्या धंद्यासाठी म्हणूनच त्या गावची बलुती त्याला मिळत होती असे ठरले, सिद्ध झाले. तर गावच्या बलुती त्याला मिळत होती असे ठरले, सिद्ध झाले. तर गावच्या लोकांनी ती बंद केली म्हणून चिडण्याचा हक्कही त्याला उरत नाही. रत्नागिरीस पूर्वी महारांनी एकदोन ठिकाणी असाच संप केला असता हिंदुसभेच्या स्वयंसेवकांसह आम्ही स्वत: गावची ढोरे ओढण्याचे नि सोलण्याचे काम करावयाला आनंदाने सिद्ध झालो होतो. तीच गोष्ट भंग्यांची. त्यांनी भंगीकामात कोणतीच हीनता मानू नये. ते काम करूनही ते आता स्पृश्यत्वाचे अधिकार उपभोगू शकतील. त्यांना कोणीही हीनता मानू नये. ते काम करूनही ते आता स्पृश्यत्वाचे अधिकार उपभोगू शकतील. त्यांना कोणीही उपमर्दाने अस्पृश्य वा हीन म्हणेल तर ते दंडनीय होईल. पण जर कुठे भंग्यांची कामे सोडलीच तर समाजाने ती स्वत: करण्याची धमक धरावी, रागावू नये. म्हणजे संघर्ष पुष्कळ प्रमाणात टळतो. श्री. अप्पाराव पटवर्धन नि सेनापती बापट यांसारखी थोर मनाची माणचे नगराचे मार्ग झाडणे नि संडास साफ करणे हे मन:शुद्धीचे एक साधन म्हणून नित्य नियमाने ती कामे हौसेने करतात. गेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात स्पृश्य स्वयंसेवकांनी स्वेच्छेने सारे भंगी काम कर्तव्य म्हणून केले.